*ग्रामपंचायतचे उपसरपंच व दोन सदस्य अपात्र*

सावली तालुक्यातील सामदा बूज ग्रामपंचायत तीन सदस्यांवर अपात्र कार्यवाही करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि ग्रामपंचायत सामदा बूज येथील ग्रा.प.उपसरपंच नितेश मनोहर जुवारे  हे सन २०२१ च्या ग्रामपंच्यात निवडणुकीत सदर पदावर कार्यरत होते.

जिल्हाधिकारी आदेश

उपसरपंच नितेश जुवारे व त्यांच्या सोबत दोन ग्रामपंचायत सदस्य यांंनी जागा हडप करून स्वतःच्या नावे इंपंजीला नोंद करून अतिक्रमण करून धान पिक घेत असून व वन विभागाच्या व गावठाण मधील सरकार जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी व त्यामध्ये बांधण्यात आलेली शासकीय विहीर हि अतिक्रमण जागेवर असू शकते असे सभ्रम असल्याचे लक्षात आल्याने ह्या बाबत वन विभागानी चौकशी करुन सदर अहवाल व इतर कागदपत्राच्या आधारे जिल्हाधिकारी १९५८ चे कलम १४ (१) व ( ज -३ ) नुसार दोषी आढळून आल्याने उपसरपंच व दोन्ही सदस्यांवर अपात्रेची कार्यवाही २८/०३/२०२४ रोजी करण्यात आली आहे.