चल संदीप…लाग कामाला…पक्ष आदेशाने गिरहे लागले सेवेच्या कार्याला

1661

गेल्या अनेक वर्षांपासून सेवेचे व्रत घेऊन समाज कार्यात वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्या ला कामाचे श्रेय म्हणून जिल्हा प्रमुख पद मिळाले.आणि पदाचे सोने करीत पक्ष काम वाढविले. आता पुढे होणाऱ्या विधानसभा च्या निवडणूक मध्ये पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन उभा राहतो फक्त तुमचा आशीर्वाद ठेवा भावनिक साद संदीप गिरहे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा…. *’चल संदीप…लाग कामाला….माझी साथ आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद तुला’* आहे असे म्हटले आणि जिल्हा प्रमुख संदीप गिरहे हे कामाला लागले आहे.

जिल्हा प्रमुख संदीप गिरहे हे बल्लारपूर-पोंभुरणा-मूल या क्षेत्रातून विधानसभा लढण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून तयारी करीत आहे.त्याच्या कार्याची दखल खुद्द पक्ष प्रमुखांनी घेतली त्यामुळे महाविकास आघाडी तर्फे ही जागा शिवसेनेच्या कोठ्यात येईल हे 100 टक्के सत्य असून संदीप गिरहे हे सामजिक कार्याला लागले आहे.

 

लोकसभेच्या निवडणूकिमध्ये महाविकास आघाडी म्हणून त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत ताकदीने उभे होते.कुणबी जातीचे असलेले गिरहे मात्र जातीच्या पलीकडे जावून आपले काम करतांना दिसतात.पुढे होणाऱ्या विधानसभा च्या निवडणुकीत मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार आहे.आणि तसे मौखिक आदेश प्राप्त झाल्याने आपला कामाचा,कार्याचा,व कार्यक्रमाचा जोर सुद्धा संदीप गिरहे यांनी वाढविला आहे.

कांग्रेस मध्येही उमेदवारी साठी रस्सीखेच?या

च क्षेत्रातून कांग्रेस पक्षा कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,माजी जिप उपाध्यक्ष विनोद अहिरकर,माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,डॉ.अभिलाषा गावतुरे,माजी जिप अध्यक्ष प्रकाश मारकवार,राजू झोडे हे सुद्धा तिकीट मिळावी म्हणून प्रयत्न शील आहे मात्र गेल्या 30 वर्षांपासून या क्षेत्रात कांग्रेस चा आमदार निवडून न आल्याने महाविकास आघाडीत शिवसेना उमेदवारी वर ठाम राहणार असल्याचे कळते.तसेच कांग्रेस मध्ये जास्तीचे उमेदवार असल्याने भविष्यात बंडखोरी होण्यापेक्षा उमेदवारीच शिवसेना कडे गेली तर त्याला कांग्रेसचे नेतेही विरोध करणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.