ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य साठी एकोरी देवीला साकळे

625

राज्याचे लोकप्रिय नेते, राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य, व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन, व्याहाड बुज येथिल प्रसिद्ध एकोरी माता मंदिर येथे गावातील जेष्ठ नागरीकांच्या सहकार्याने आदरणीय सुधीरभाऊंना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्यांचा नेहमी सहभाग राहो अशी प्रार्थना, पूजा सोबतच भजन ठेवण्यात आला.

जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू असलेले सुधीरभाऊ हे सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी तत्पर असतात म्हणून तालुक्यातील ओबीसी व एन टी समाज बांधव यांचे रखडलेले घरकूल मंजूर केले.विकास पुरुष असलेले सुधीर भाऊ यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच प्रार्थना घेऊन एकोरी देवीला साकळे घातले असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्राचे नेते माजी जिप बांधकाम सभापती संतोष सावकार तंगडपल्लीवार यांनी दिली.

यावेळी त्यांच्या समवेत सावली पंस माजी उपसभापती रवींद्र बोलीवार,
परशूराम भोयर उपसरपंच व्याहाड बूज. नामदेव भोयर शक्ती3 केंद्र प्रमुख, पतरू गेडाम ,रविंद्र निकेसर, विनोद तोडेवार,विनोद मेश्राम, कोलते, मोहूर्ले, गेडाम या पदाधिकारी सोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.