हिरापूर टोल नाक्यावर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

3876

*दुचाकी स्वारांना रस्ताच नसल्याने अडचण*

भरधाव येणाऱ्या ट्रकने टोलनाक्याजवळ दुचाकीला जोरदार धड़क दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दिनांक 31 ला दुपार च्या सुमारास घडली.

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर टोल नाक्यावर सुरेश गोमाजी आगरे ५० वर्ष हा मूल तालुक्यातील भेजगाव येथील आहे. हा गेली २० वर्षा पासून गडचिरोली येथे स्टेशनरीचे काम करीत होता. आज आपल्या भेजगाव या गावी जाण्यासाठी दुचाकी.एम एच ३४ ए एक्स ३४८ ने जात असतानाच त्याच मार्गाने तांदूळ भरून गोंङपिपरी कडे जाणाऱ्या भरधाव ट्रक ने दुचाकी ला जोरदार घड़क दिली त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाला.धडक एवढी जोरदार होती की शरीर चे तुकडे तुकडे झाले होते. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी येवून मृतक सुरेश आगरे यांना शवविच्छेदन करण्यासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात आले.तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

*टोल नाक्यावर दुचाकी साठी मार्गच नाही*

चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील हिरापूर येथे टोल नाका लावण्यात आलेला आहे मात्र या टोल नाक्यावर दुचाकी स्वाराला जाण्यासाठी योग्य रस्ताच बनविण्यात आला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.तसेच या बाबत अनेकदा टोक वसुली करणाऱ्या कंत्राटदार ला सांगितले मात्र हा रस्ता दुचाकी साठी अशी उद्धट उत्तरे देत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे त्यामुळे त्या ठिकाणी दुचाकी साठी व्यवस्थित रस्ता तयार करावे अशी मागणी प्रवाशींनी केली आहे.