मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समितीवर भाजप युवा नेते किशोर वाकुडकर यांची निवड

818

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील सनियंत्रण व आढावा समिती मध्ये सावली तालुक्यातील भाजप युवा नेते किशोर वाकुळकर यांची विधानसभा क्षेत्र सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पाठविलेले पत्रात म्हटले की,
आपली उपरोक्त समितीवर निवड करुन नवीन जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. या समितीच्या सदस्यपदावरून महिलांच्या हितासाठी सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य आपल्याव्दारे होणार आहे. सदर समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहुन विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनाचा लाभ मिळवून देवून महिलांना सक्षम करण्याची संधी आहे.

आपण कार्यक्षम व्यक्ती असून या जबाबदारीचे निर्वाहन समर्थपणे कराल याचा मला पूर्ण’ विश्वास आहे. सदर समितीच्या माध्यमातून लोककल्याणकारी कार्य आपल्या हातून घडतील ही अपेक्षा बाळगतो अश्या शुभेच्छा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

भाजपा युवा नेते किशोर वाकुलकर यांची समितीवर निवड झाल्याबद्दल माजी आमदार प्रा.अतुल देशकर,भाजप नेते संतोष तंगळपल्लिवार, तालुका अध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,महिला जिल्हा उपाध्यक्ष,नगरसेविका नीलम सुरमवार, देवराव मुद्दमवार,अर्जुन भोयर,दौलत भोपये,अरुण पाल,आशिष कार्लेकर, सचिन तंगडपल्लीवार,गौरव संतोषवार,राकेश विरमलवार,रवींद्र बोलीवार,कृष्णा राऊत,विनोद धोटे,तुकाराम ठिकरे,डॉ.धारने,यांच्या सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.