8 लाख 97 हजार 200 रुपयांचा गांजा जप्त,डिबी पथकाची कारवाई

1289

हरियाणा येथील एका आरोपीस अटक…बल्हारशाह राजुरा मार्गातील राजुरा शहराबाहेरील एका झोपडीत गांजा असल्याच्या गोपनीय माहितीवरून राजुरा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने धाड टाकून केलेल्या कारवाईत 8 लाख 92 हजार 200रुपये किमतीचा 89.72किलो गांजा जप्त करून हरियाणा येथील एका आरोपीस अटक केली आहे ही कारवाई काल दिनांक 15 आगस्ट चे दुपारी दीड वाजे दरम्यान करण्यात आली.

 

राजुरा हे तेलगणा राज्यांच्या सीमेलगत असल्याने गांजा तस्करी बऱ्याचदा होत असल्याचे समजते दरम्यान राजुरा पोलीस ठाण्यातील डिबी पथकाला राजुरा शहराबाहेरील ओंमसाई मंगल कार्यालय समोरील खुल्या जागेत असलेल्या एका झोपडीत एक ईसमाकडे गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली माहिती मिळताच पोलीस पथक व पंच ,वजन मापक,सह,घटनास्थळी धाड टाकून त्या आरोपीस विचारणा करून झडती घेतली असता झोपडीत 89,72 किलो गांजा आढळून आला याची किंमत 8 लाख 97 हजार 200 रुपये असल्याचे सांगण्यात आले याप्रकरणी हरियाणा राज्यातील रहिवासी असलेल्या आझाद रामफल सिंग वय 36 राहणार चुलकांना तालुका संमलखा जिल्हा पानिपत यास अटक करण्यात आली आणि त्याचे विरुद्ध NDPS कायद्या अंतर्गत कलम 8(क)20(ब)अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे

 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन ,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी,दीपक साखरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,डिबी पथकाचे उप निरीक्षक पांडुरंग हाके,उपनिरीक्षक भीष्मराज सोरते,उपनिरीक्षक नरेश उरकुडे,पोलीस हवालदार किशोर तुमराम,राजनारायन ठाकूर,नूतन डोर्लीकर,वेणू नुतलवार,तिरुपती जाधव,महेश बोलगुडवार,रामराव बिंगेवाड, योगेश पिदूरकर,अविनाश बाबोळे, आकाश पिपरे यांनी केली