


सद्या वाघ व बिबट ने धुमाकूळ घालायला सुरूवात केली असून सावली तालुक्यातील शिरशी येथिल जंगल परिसराला लागून नाल्याजवळ गावातील गुरे राखणाऱ्या गुराखी वर मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला केला आणि त्याला जागीच ठार केले.त्याच्या सोबत असलेला दुसरा गुराखी हा धावत धावत येवून सदर माहिती सांगत असतांनाच तो बेशुद्ध झाला.
सदर घटनेनंतर गावकरी यांनी वनविभाग ला सावली ला माहिती दिली व घटनास्थळी शोध कार्याला सुरुवात केली असता त्या ठिकाणी
दिवाकर नथूजी आवडे वय 45 वर्ष रा.शिर्शी हा मृतावस्थेत आढळून आला.या जंगल परिसरात मोठ्या प्रामानात हिंसक प्राणी असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हिंसक वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी शिर्शी ग्रामस्थांनी केली आहे.