. प्राथमिक शाळा अंतरगावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी राकेश तेलकापल्लीवार तर उपाध्यक्ष सौ. सपना कंकडालवार यांची बिनविरोध निवड

469

 

सावली तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतरगाव येथे 28/8/2024 ला सन 2024-2026 करिता शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी पालक सभेची आयोजन करण्यात आले.

या पालक सभेला उपस्थित गटशिक्षणधिकारी सावली बोंडे सर,केंद्रप्रमुख अंतरगाव ताटघट सर, केंद्रप्रमुख बावणे सर,मुख्याध्यापीका साखरकर मॅडम, पोलीस पाटील छगनजी उंदिरवाडे, तंमूस अध्यक्ष बाळू सहारे, पालक सभेचे अध्यक्ष मोतीराम ढाक यांचा उपस्थिती मध्ये पालकांच्या बहुमताने समिती पुनर्गठन करण्यात आली.

निवड करण्यात आलेल्या सदस्या मधून अध्यक्ष पदी राकेश तेलकापल्लीवार व उपाध्यक्ष सौ. सपना कंकडालवार यांची निवड करण्यात आली. तर समितीच्या सदस्य पदी नितीन चिमुरकर, तानाजी राऊत, मुक्तेश्वर मस्के, मुरलीधर बारापत्रे, श्रीमती विदया सुनिल बावणे,सौ सुशीला जगदीश तरारे, सौ सारिका लोमेश ढाक, सौ यामीना गुरुदेव बनसोड यांची निवड करण्यात आली.