


निर्धार सावलीच्या विकासाचा हेच ब्रीद वाक्य आणि त्या नुसारच राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रम्हपुरी-सावली क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सावली शहरात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा दि. २८ सप्टेंबर २०२४ (शनिवार) वेळ : सकाळी ११ वाजेपासून पार पाडणार आहे.
सकाळी 11 वाजेपासून सुनिल बोरकर ते करिमचंद खोब्रागडे ते हरांबा रोडपर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचे भूमिपूजन होईल.त्यानंतर बंडू गोलकोंडावार ते संदिप चुनारकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन होईल.त्यानंतरभाकरे पाटील ते संतोष कावळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचे भूमिपूजन पार पाडेल.
त्यानंतर अनंत मोहुर्ले ते मारोती लेनगुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड व पाईप नालीचे बांधकामाचे भूमिपूजन होईल.अनिल म्याडावार ते अशोक आकुलवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकामाचे भूमिपूजन पार पाडेल.महर्षि वाल्मीकी यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्याकरण करून बांधकामचे भूमिपूजन सोहळा हा केवट समाजाचा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतरराष्ट्रीय महामार्ग वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,येथे
विजयस्तंभाचे भूमिपूजन व सौंदर्याकरण कामाला सुरुवात करणार आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी खासदार नामदेवजी किरसान राहणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून कांग्रेस जेष्ठ नेते संदीप गड्डमवार, जेष्ठ कांग्रेस नेते दिनेश चिटनूरवार, सावली तालुका अध्यक्ष नितीन गोहणे,महिला तालुका अध्यक्ष उषाताई भोयर,नगराध्यक्ष लताताई लाकडे,उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार राहणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे व काही अडीअडचणी असल्यास त्यांनी भेट घ्यावी असे आवाहन सावली शहर कांग्रेस कमिटी तसेच नगरपंचायत चे पदाधिकारी यांनी केले आहे.