


सावली(सूरज बोम्मावार)
सावली शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात अनेक विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या सोहळ्याला ब्रह्मपुरी -सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मात्र या संपूर्ण सोहळ्यात नगराध्यक्ष लता लाकडे यांच्या सह काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहून चक्क बहिष्कारच घातल्याचा प्रकार आज उघडकीस आलेला आहे. त्यामुळे सावली कांग्रेस मध्ये आलबेल नाही व गटा गटाचे राजकारण सुरू असल्याचे हे या निमित्ताने दिसून आलेले आहे.
सावली विकासाचा ध्यास बाळगणारे ब्रह्मपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा विकास कामांचा आज धडाका सावली शहरांमध्ये सुरू केला होता. सावली शहरातील विविध प्रभागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष नेते तथा या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत खासदार नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सावली शहरातील अनेक प्रभागात विविध ठिकाणी भूमिपूजन पार पडला.यावेळी वडेट्टीवार यांच्या सोबतीने नप उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार हे 9 नगरसेवक सह सावलीसारखे सोबत होते
मात्र या संपूर्ण भूमिपूजन सोहळ्यात आज सावली नप नगराध्यक्ष लता लाकडे यांच्यासह सावली शहर काँग्रेस अध्यक्ष,नगरसेवक विजय मुत्तेलवार,सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार,सावली शहर महिला काँग्रेस अध्यक्ष भारती चौधरी यांच्या सोबतच तीन ते चार नगरसेवक व काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा यांची अनुपस्थिती होते.
भाऊंनी बोलविले म्हणून नागपूर ला धावत-पळत सुटणारे पदाधिकारी व काही नगरसेवक हे भाऊ गावात आल्यावरही न येणे,त्यांचे फोन न घेणे तसेच कार्यक्रम वर अनुपस्थित राहून बहिष्कार टाकणे सारखे आहे. सर्वच पदाधिकारी नेहमीच सोबत असणारे आज मात्र ते दिसले नाही त्यामुळे हे पदाधिकारी गेले कुठे असा प्रश्न या निमित्ताने सावली शहरात चर्चेला जाऊ लागलेला होता.
त्यामुळे सावली शहरातील काँग्रेसमध्ये सध्या आलबेल नाही असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त केला जाऊ लागलेला आहे. या अनुपस्थितीवर खुद्द वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे मात्र नगराध्यक्ष व पदाधिकारी हे अनुपस्थित राहणे इतपत नाराजी कशामुळे आली आणि या मागचा कारण काय? या संदर्भातला उत्तर हे नाराज असणारे पदाधिकारी,नगरसेवकच देवू शकतील असे बोलले जावू लागले आहे.