


दिनांक 8 मार्च, 2025 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा सहकार भारती चे वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूर यांचे सभागृहात मोठ्या थाटात पार पाडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ.अश्विनी ताई दाणी, बौद्धिक प्रमुख, राष्ट्र सेविका समिती, चंद्रपूर, डॉक्टर सौ.प्रेरणा कोलते, सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट व अध्यक्ष, संताजी नागरी सहकारी पतसंस्था, चंद्रपूर, तसेच ॲड. क्षमा धर्मपूरिवार, अध्यक्ष, महिला व बालविकास समिती ह्या मंचावर उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलाने झाली.
सदर कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिश्ताब्दी वर्षा चे औचित्य साधत त्यांच्या एकदरीत जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. सौ.अश्विनीताई दाणी यांनी अतिशय सुंदर व सविस्तर मुद्देसूद मांडणी करत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सर्वांचे समोर मांडले.
तत्पूर्वी ॲड.सौ.क्षमा धर्मपूरिवार यांनी महिला व बालकल्याण या विषयावर एक कायदेतज्ञ म्हणून आपले विचार मांडले तसेच सदर बाबत काय काय प्रचलित कायदे आहेत व त्याचा कसा लाभ घेतला पाहिजे याचीही माहिती दिली तसेच या क्षेत्रातील त्यांचा अनुभव कथन केला. कमी वयात विवाह, घरातील संस्कार व त्याचे महत्त्व तसेच आज घरातील संस्कार किती महत्त्वाचे आहे हे समजाऊन सांगितले.
त्यानंतर डॉक्टर सौ .प्रेरणा कोलते यांनी महिलांविषयी आरोग्य जागृती याबाबत विषयाची मांडणी केली व सर्व महिलांमध्ये जागृती व्हावी असे मत प्रकट केले. अशाप्रकारे विचाराचा त्रिवेणी संगम महाकुंभ येथे पार पडला.
या कार्यक्रमास बऱ्याच महिला आवर्जून उपस्थित होत्या याशिवाय सहकार भारती चंद्रपूर जिल्हा तसेच माननीय विजयराव गोटे उपाध्यक्ष सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश, सौ पुष्पा ताई गोटे, महामंत्री सहकार भारती चंद्रपूर जिल्हा, महिला प्रमुख सौ प्रगती माढइ, मान्य. सतीशजी वासमवार अध्यक्ष सहकार भारती चंद्रपूर जिल्हा, श्री श्री किशोर महालक्ष्मे, अध्यक्ष भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था नवरगाव तथा उपाध्यक्ष सहकार भारती चंद्रपूर जिल्हा हे सुद्धा उपस्थित होते. याशिवाय भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.