


बाल आनंद मेळावा,गीत गायन व समूहनृत्य आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण
स्त्री हीअबलानसूनसबलाआहे.कन्या,पत्नी,सून,माता,सासू,आजी या भूमिका साकारणा-या महिलांची महत्ती दर्शविणारे जागतिक महिला दिन नुकताच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कापसी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उज्वलाताई सातपुते होत्या.विशेष अतिथी म्हणून सुनिताताई काचिनवार सरपंच ग्रामपंचायत कापसी,शारदाताई कोहळे उपसरपंच ग्रामपंचायत कापसी, सुनिता पेंदाम सेवानिवृत्त शिक्षीका,प्रमुख पाहुणे म्हणून नितेश भांडेकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कापसी, सदानंद पिपरे, निलिमाताई सातपुते,जिजाताई मेश्राम,माधुरी ताई शेंडे,निलीमाताई भांडेकर,शशीकलाताई सोयाम,सपनाताई मोहुर्ले, संध्याताई भांडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली व पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने व पुष्पगुच्छाने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल पेंदाम विषय शिक्षक यांनी केले.भावना खानोरकर , मनीषा आसुटकर, गोपाल पेंदाम,व सुनिता पेंदाम यांनी महिला दिनाची महत्ती विशद करणारे गीतगायन केले. संजीवनी अतुल भोयर, स्वामिनी नोमेश्वर ताडाम,कृतिका पितांबर परचाके, नैतिक रघुनाथ मेश्राम या विद्यार्थ्यांनी महिलादिनाची महत्ती भाषणाद्वारे व्यक्त केले.तसेच किरणताई बंडु भांडेकर या मातापालक यांनी महिलांचं गौरव गीत गायन केले. सुनिताताई काचिनवार,निलीमाताई भांडेकर , भावना खानोरकर, गोपाल पेंदाम,मनिषा आसुटकर यांचे महिलांच्या कार्याविषयी समायोचित भाषणे झालीत. त्यानंतर फीत कापून बाल आनंद मेळावा खरी कमाई चे उद्घाटन करण्यात आले.आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मेनूचा आस्वाद गावातील महिला व युवक युवती तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका बारसागडे वर्ग ४ था या विद्यार्थिनीने केले व आभार देविका बंडू भांडेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शालेय मंत्रीमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.जागतिक महिला दिन व बाल आनंद मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मेनूचे स्टाल ला फुलांची नांवे देण्यात आली होती. अप्पे चटणी,समोसे,भजे,वडे,पुरी भाजी, चिवडा, तर्री पोहा,गुलाबजामून,फिंगर आलू,उकळलेले बोरे, यासह इतर खाद्य पदार्थ तयार करण्यात आलेले होते. अखेरीस सर्व महिला,शिक्षक व विद्यार्थी यांनी सामूहिक नृत्य करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.