क्रीडांगणाच्या जागेसाठी उद्या सावली बंद व मोर्चाचे आयोजन

528

 

“क्रिडांगणासाठी सावलीकर एकवटले”

*सावली(तालुका प्रतिनिधी)*
नगरपंचायत हद्दीतील संत योगी नारायण बाबा मठा परिसरात असलेली भव्य खुली जागा क्रीडांगणा करिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची असलेली जागा सुद्धा क्रीडांगणा करता देण्यात यावी अशी मागणी सावली येथील शेकडो क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली असून सदर जागेसाठी उद्या सोमवार (दि.१७)ला सावली शहर क्रिडांगण बचाव समितीच्या माध्यमातून सावली शहर बंद आणि वनविभागावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. ७९८) या जागेवर मागील पाच ते सहा वर्षापासून अनेक खेळाडू, स्पर्धक इथे सराव करतात, सावली नगर पंचायत तसेच सावली मित्रपरिवारातर्फे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच ग्राउंडवर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले ग्राउंडचा उपयोग करतात, त्यात लहान तरुण व प्रौढ व्यक्ती अनेक खेळाचा उपयोग या ग्राउंडवर करतात करिता या जागेची सावली शहरातील व तालुक्यातील शिकणाऱ्या विद्यार्थी व विध्यार्थीनिंना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, या ग्राउंडच्या माध्यमातून युवा वर्गाने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे, सदर क्रीडांगावरून अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नौकरी करीत आहेत व सुशिक्षित, बेरोजगार, तरुण-तरुणी, याच क्रीडांगनाचा उपयोग करतात. म्हणून हि जागा सावली शहरात क्रीडांगासाठी मिळावी, अशी सावलीवासियांची मागणी आहे.

सावली नगरात क्रिडांगण निर्माण व्हावेत म्हणून आमदार विजय वड्डेटीवार यांनी 12.50 कोटी रुपये मंजूर केले. काही दिवसात कामाचे टेंडर सुद्धा काढण्यासाठी दिले. आणी आता सावली शहरात क्रिडांगणा ऐवजी आदिवासी वसतिगृह निर्माण होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ती जागा क्रिडांगणालाच देण्यात यावी ,करीता सावली शहर क्रिडांगण बचाव समितीच्या माध्यमातून सोमवारला शहर बंद व मोर्चा काढण्यात येणार आहे.