आज दिनांक 22 एप्रिल ला सावली येथे दुपारी 1 वाजता सावली तालुक्यातील सहकारी पतसंस्था व ईत्तर संस्था च्या सदस्यांची बैठक जयकीसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीला सहकार भारती चे जिल्हाध्यक्ष सतीश वासमवार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा उपाध्यक्ष सूरज बोम्मावार यावेळी उपस्थित होते. सहकार भारती चे सुरू असलेले काम व सहकार बद्दल ची उद्दिटे,येणाऱ्या अडीअडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली.त्यानंतर सावली तालुका सहकार भारतीची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

यात अध्यक्ष म्हणून जयकीसान नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पा. गड्डमवार यांची निवड करण्यात आली. तर महामंत्री म्हणून महात्मा फुले नागरी पतसंस्थेचे संचालक विलास आकुलवार ,संघटन प्रमुख म्हणून विदर्भ नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अतुल लेनगुरे,कोषाध्यक्ष म्हणून विदर्भ नागरी पतसंस्थेचे सचिव शंकर दिकोंडवार,उपाध्यक्ष म्हणून महात्मा फुले नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितेश रस्से,सचिव पदी वैनगंगा नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र राचेवार यांची निवड करण्यात आली तर कार्यकारणी सदस्य म्हणून मच्छी पालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुदाम राऊत, प्रविणभाऊ नागरी संस्थचे व्यवस्थापक रवींद्र आडेपवार,दि महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष तथा विविध कार्यकारी चे उपाध्यक्ष चरणदास बोम्मावार,ज्योशाबा पतसंस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दुधे, जिप शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक दत्तूजी निकुरे,वैनगंगा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय कोरेवार, महात्मा फुले नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक गेंद्रनाथ मोहूर्ले यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित कार्यकारणी चे अभिनंदन करण्यात आले.