
शिक्षण विभागाच्या मनमानी आणि तानाशाही धोरणांच्या निषेधासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेवर दि.23 ला धरणे आंदोलन

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार व मनमानी धोरणाविरोधात सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना चंद्रपूरच्या वतीने दिनांक २३ एप्रिल २०२५ ला दुपारी २ ते ५ वाजेपर्यंतच्या भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी सर्व शिक्षकांनी २३ एप्रिलच्या भव्य आंदोलनात उपस्थित राहावे. व आपली एकता दाखवावी .यासाठी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नम्र आवाहन करण्यात येत आहे